
Ladki Bahin : महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली. याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला. त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या योजनेचा पुढील हफ्ता लवकरच मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणीसांठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींना आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. १३ लाख पेक्षा जास्त घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त घरे मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठिशी असल्याचे दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
|
|
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे. आता १३ लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहे. यावर्षी गरिबांसाठी २० लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता.
या योजनेसाठी २६ लाख अर्ज आले होते. मात्र आता २० लाख मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ, तशीच एक महत्त्वाची घोषणाही करण्यात आली आहे. यात काही निकशांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील ५ वर्षात घरे देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे
या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे. यामुळे आता लाडक्या बहीणीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच महायुती सरकारही लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

