Laapataa Ladies Film : ‘ॲनिमल’ पेक्षा ‘लापता लेडीज’ ठरली जबरदस्त, काही दिवसातच नेटफ्लिक्सवर मिळाले मिलियन्स व्ह्यूज

Laapataa Ladies Film : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडिज' चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स २४ कोटींची कमाई केलेली आहे. नुकतंच हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'ओटीटीवर रिलीज झालेला आहे. सध्या ह्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ओटीटीवर एक नवा विक्रम रचला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटाला ओटीटीवर मागे सारत स्वत:चा नवा विक्रम रचला आहे. किरण रावच्या 'लापता लेडिज' चित्रपटाला ओटीटीवर सर्वाधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.

किरण रावचा 'लापता लेडीज' चित्रपट एकामागून एक नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. 'लापता लेडीज' नेटफ्लिक्सवर गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाने ओटीटीवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवत धुमाकूळ घातला आहे.

Dombivli MIDC Fire : डोंबिवली MIDC आगीत ६ जणांचा मृत्यू, ३४ जखमींवर उपचार सुरू

किरण रावच्या 'मिसिंग लेडीज'ने नेटफ्लिक्सवर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटाला मागे टाकले आहे. या चित्रपटाने ओटीटीवर १३.८ मिलियन्सच्या व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे. किरण रावने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचं कौतुक फक्त चाहत्यांनीच नाही तर, समीक्षकांनी आणि अनेक सेलिब्रिटींनीही कौतुक केलं. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारे कथानक प्रेक्षकांना फार भावला आहे.

'लापता लेडीज' चित्रपटाने जरीही 'ॲनिमल' चित्रपटाला मागे टाकलं असलं तरीही हृतिक रोशनच्या 'फायटर'चा रेकॉर्ड मोडू शकला नाही. हृतिक रोशनच्या 'फाइटर'ला नेटफ्लिक्सवर १४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 'लापता लेडीज' चित्रपटाला इतके व्ह्यूज एका महिन्याच्या आत मिळाले आहेत, तर 'ॲनिमल'ला इतके व्ह्यूज चार महिन्यात मिळाले आहेत. किरण रावचा 'लपता लेडीज' चित्रपट १ मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तर ओटीटीवर हा चित्रपट २६ एप्रिलला रिलीज झाला होता. 'मिसिंग लेडीज' चित्रपट भारतासह जगभरात नेटफ्लिक्सवर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply