मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाImage Credit source: Instagram
Ladki Bahin Yojana e-KYC : ई-केवायसी पडताळणी सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षापर्यंत महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2.4 कोटींहून अधिक लाभार्थी महिला होत्या. परंतु ई-केवायसीद्वारे पडताळणी सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2025 महिन्यात फक्त 1.6 कोटी लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला. जानेवारी महिन्याच्या मध्यात हा हप्ता मिळाला होता. म्हणजेच एकूण 86 लाखांच्या लाभार्थ्यांचा घट झाला आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र ही मुदत फक्त चुका दुरुस्त करण्यासाठी आहे. नव्याने केवायसी करण्याची मुदत संपली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येतेय.
महिलांनी भरलेला चुकीचा फॉर्म
सप्टेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत 2.4 कोटींहून अधिक लाभार्थ्यांपैकी फक्त 1.9 कोटी महिलांनी ई-केवायसी केलं. यापैकी ज्या महिलांचे ई-केवायसीचे तपशील अचूक होते, अशा जवळपास 1.6 कोटी महिलांना डिसेंबर 2025 साठीचा हप्ता मिळाला. ई-केवायसी करताना अनेक महिलांनी फॉर्म चुकीचा भरला होता. ‘तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी करत नाही ना’, असा प्रश्न ई-केवायसी भरताना विचारण्यात आला. तेव्हा अनेक महिलांनी त्यावर ‘नाही’ असं उत्तर देण्याऐवजी होकारार्थी पर्याय निवडला होता.
जानेवारीचा हप्ता थकीत
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यातील हप्तासुद्धा अद्याप मिळाला नाही. याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या योजनेचा निधी अद्याप ज्या विभागांद्वारे वितरित करण्यात येतो, त्यांच्याकडून तो पूर्णपणे मिळालेला नाही. या योजनेचा लाभ पारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. परंतु ई-केवायसी करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली, तर काहींकडून चुकीच्या नोंदी झाल्या.
ई-केवायसीबद्दल महिला व बालविकास मंत्री अदित तटकरे म्हणाल्या होत्या, “ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषकरून ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.

























Subscribe to my channel

