Kunal Raut : मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळं फासणं भोवलं; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या सुपुत्राला अटक

Kunal Raut : मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळं फासणं माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना भोवलं आहे. कुणाल राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करून सरकारच्या बॅनरला काळे फासले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कुणाल राऊत यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा परिषदेसमोर लावण्यात आलेल्या 'विकसित भारत' या मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळं फासणे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना महागात पडलं आहे. कुणाल राऊतांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त करत काळं फासलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये राडा; कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

पोलिसांनी कुणाल राऊत यांना कुही परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कुणाल राऊत यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कुणा राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत जाऊन 'मोदी की गॅरंटी' या आशयाच्या बॅनरवर काळं फासले होते. तसेच त्यांनी बॅनरवरील मोदी या शब्दावर दुसरे स्टिकर्स लावले होते.

या प्रकरणी पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज कुणाल राऊत यांना रविवारी सायंकाळी कुहीमधून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply