पुणे : कोयना एक्स्प्रेस आता विद्युत इंजिनवर धावणार

पुणे : मुंबई-कोल्हापूर धावणारी कोयना एक्स्प्रेस आता पुणे ते कोल्हापूरदरम्यान विद्युत इंजिनवर धावणार आहे. सध्याच्या रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोयना एक्सप्रेसला आता पुणे स्थानकांवर डिझेल इंजिन जोडावे लागणार नाही. विद्युत इंजिनवरच मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास पूर्ण करेल. याची तारीख अद्याप ठरली नसून, येत्या दोन ते तीन दिवसांत तारखेबाबतचा निर्णय होईल. पुणे-कोल्हापूर सेक्शनमध्ये विद्युत इंजिनवर धावणारी ही पहिली रेल्वे ठरणार आहे.

पुणे ते मिरजदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. विद्युतीकरणाचे एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. सध्या वापरात असलेल्या मार्गावरचे काम पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने कोयना एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर स्थानकात विद्युतीकरणाचे काही काम अद्याप शिल्ल्क आहे, ते पूर्ण होताच अन्य रेल्वेदेखील विद्युत इंजिनवर धावतील. पहिल्या टप्प्यात मात्र कोयना एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विद्युत इंजिनवर रेल्वे धावल्याने डिझेलच्या वापरात बचत होईल.

‘‘लवकरच कोयना एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावेल, याची तारीख अद्याप ठरलेली नाही. विद्युत इंजिनमुळे डिझेलच्या वापरात बचत होईल.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply