Kota Student: कोटामध्ये चाललंय काय? NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; तीन महिन्यांमध्ये 8 प्रकरणं समोर

Kota Student: राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. NEET च्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षात आत्तापर्यंत 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या मोहम्मद उरुजने गळफास घेत आत्महत्या केली होती. अशातच आज आणखी एका कोचिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौम्या असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी आहे. ती कोटामध्ये राहून NEET ची तयारी करत होती. या घटनेची माहिती विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. ते कोटा  येथे पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास केला जाईल.

मानसिक तणावाचा सामना करत आहेत विद्यार्थी

तज्ञांच्या मते, आजकाल कोटामधील विद्यार्थी मानसिक तणावाशी लढा देत आहेत. अभ्यासाच्या दबावाशिवाय कौटुंबिक दबावासह इतर कारणे समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे भविष्य उज्वल करण्याऐवजी स्वतःलाच उद्ध्वस्त करत आहेत. अभ्यासाबाबत स्पर्धा एवढी वाढली आहे की, जे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात टॉपर होते, ते सध्या मानसिक तणावातून जात आहेत. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबाबत संशोधन करताना कुटुंबीयांकडूनही खूप दबाव असल्याचे समोर आले आहे.

Loksabha Election 2024: 'माझ्याकडे निवडणूक लढवायलाही पैसे नाहीत', निर्मला सीतारामन असं का म्हणाल्या?

२०२४ मध्ये आत्तापर्यंत ८ विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने आता चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. जानेवारी 2024 पासून मानसिक तणावामुळे 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये बीटेकच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे अभ्यासाशी संबंधित मानसिक ताण समोर आला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि विविध संस्थांचे दावेही फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply