Konkan Rain : महापुराचा धोका! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरीतील 571 कुटुंबांमधील 1700 लोकांचं स्थलांतर

रत्नागिरी : मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले तरीही जुलै महिन्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. दीड महिन्यात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तांचे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.

मागील पंधरा दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. वेगवान वाऱ्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांचे नुकसान वाढले आहे. पुरामुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापुरात नुकसानीची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भुस्खलनाचाच आहे. इर्शाळवाडतील घटनेमुळे जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांवरील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याची कडक अंमलबजावणी केली गेली. जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे धोका होऊ शकतो, अशा २४ गावांतील १३० कुटुंबांतील ४७७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एकूण ७०१ कुटुंबांतील २०७८ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. स्थलांतर करताना अनेकांनी आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यांचे स्थलांतर समाजमंदिर, शाळेत करण्यात आले आहे, अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे दोन लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुरवठा विभागाकडून त्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यक तेथे शिवभोजन थाळीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. अति पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे नुकसान कमी झाले आहे.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; नदीपात्रात 7112 क्यूसेकनं विसर्ग सुरू, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि राजापूर या पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये ११२ शेतकऱ्‍यांचे १७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले पावसामुळे जिल्ह्यात १९२ घरांचे अंशत: ६८ लाख रुपये, ३४ अंशत: व दोन पूर्णतः गोठ्यांचे १७ लाख ६७ हजार रुपये आणि ३० सार्वजनिक मालमत्तांचे ५० लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा पावसामध्ये आतापर्यंत एक बळी गेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply