Konkan Railway : कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं भूमिपूजन

Konkan Railway : कोकण रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडला. कोकणातील १२ स्थानकांचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानकांचा कायापालट होण्याची आज सुरुवात होणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून चांगल्या योजना करण्याच काम सुरू आहे. रविंद्र चव्हाण यांनी याबाबत प्रकल्प तयार केला. त्यांनी ७ महिन्यात सर्व प्रक्रिया केल्या आहेत. गणपतीच्या आधी बरंच काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

कोकणात विमानतळ, रस्ते, रेल्वे स्थानक विकसीत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. समुद्र किनारे देखील विकसीत करण्याची योजना आखण्यात आली. आहे.  कोकणाच्या विकासासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Altaf Pevekar Attacks : शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर अज्ञातांकडून हल्ला; हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले अन्...



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणातल्या १२ रेल्वे स्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. कोकणाच्या दृष्टीने हा महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येकाची इच्छा असते आपलं स्टेशन स्वच्छ असल पाहिजे. पंतप्रधान मोदींनीही देशातील ५० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा फायदा होईल.

देश-परदेशातून लोकं कोकणात येतात. मात्र कोकणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी आजचा उपक्रम महत्वाचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई पुणे हायवे बनवला. त्यामुळे पुण्याचा विकासात भर पडली. मोठी गुंतवणूक तेथे आली. मुंबई पुणे जाण्यासाठी पूर्वी फार काळ लागायचा आता दोन तास लागतात, असे शिंदे म्हणाले. 

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार करण्यात आले. कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता  सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply