Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी? राणेंनी २ इच्छुक नेत्यांची नावं घेतली

Konkan Politics : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात  भाजप आणि शिंदे गट हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत. दाेन्ही पक्षातील नेते निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे माजी खासदार निलेश राणेंनी नमूद करीत पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत निर्णय घेतील असेही कुडाळ येथे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. दरम्यान आमदार वैभव नाईक यांची दखल घ्यावी इतके त्यांचे कार्य नसल्याचे निलेश राणेंनी नाईकांनी नारायण राणे  यांच्यावर केलेल्या टीकेबाबत मत व्यक्त केले.

माजी खासदार निलेश राणे म्हणाले सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार हा वरिष्ठांचा आहे. भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत.

Madrasa Removed In Pawangad : पावनगडावरील मदरसा पाडकामास सुरुवात; कोल्हापूरमध्ये संचारबंदीचे आदेश लागू

लाेकसभेसाठी जठार, सामंत इच्छुक

या निवडणुकीसाठी प्रमोद जठार व किरण सामंत इच्छुक आहेत. ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचार करतील आणि विजय मिळवतील असा विश्वास माजी खासदार निलेश राणेंनी व्यक्त केला.

वैभव नाईक दखलपात्र नाही

आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका करताना राणेंनी तेव्हा कॉंग्रेस संपवली व आता ते भाजपला संपवतील अशा टीका केली होती. यावर उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले वैभव नाईक हे दखलपात्र नाही आणि त्यांचं कार्य सुद्धा दखल घेण्यासारखं नाही.

नारायण राणेंसारख्या केंद्रीय नेत्यांवर बोलण्याची त्यांची कुवत नाही. संपलेल्या पक्षाचे ते आमदार आहेत. रिकामटेकडे असल्याने ते बाेलत सुटलेत असेही राणेंनी म्हटले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply