Kolhapur : उद्योगपती संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविकेसह दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे मालक संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी माजी नगसेविका आणि तिचा साथीदार पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

संतोष शिंदेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यांच्यांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर फरार दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. संतोष शिंदे यांनी खंडणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. याप्रकरणामुळे गडहिंग्लज शहरामध्ये खळबळ उडाली होती.

उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख होता त्या माजी नगरसेविका आणि त्यांचा साथीदार पोलीस अधिकारी याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. खंडणीच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती.

त्यानंतर माजी नगरसेविका आणि त्यांचा साथीदार दोघेही पळून गेले होते. मात्र त्यांचा पोलिसांनी शोध घेतला असून सोलापूरमध्ये ते लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना सोलापूरातून ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. संतोष शिंदेनी सुसाइड नोटमध्ये पुण्याच्या दोघांच्या नावाचा देखील उल्लेख केला होता. हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

उद्योगपती संतोष शिंदे आपल्या कुटुंबासह गडहिंग्लज शहरात राहत होते. त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभर तुरुंगामध्ये जावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते खूपच तणावामध्ये होते. तरीसुद्धा त्यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्यांनी टोकाचे पाऊल उचलत कुटुंबासह जीवन संपवले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply