
Kolhapur News : डॉक्टरांना देव म्हटले जाते. परंतु कोल्हापुरातील एका डॉक्टरने तपासाणीसाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
या डॉक्टरने त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवले. यातील सुमारे 70 ते 80 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुमारे 400 महिलांनी पत्र लिहून या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरने स्वत: शूट केले व्हिडिओ
आरोपी डॉक्टरने स्वत: या सर्व क्लिप बनवल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. या डॉक्टरने त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप साठवून ठेवल्या होत्या. त्याने लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला तेव्हा या सर्व क्लिप व्हायरल झाल्या.
या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील बहुतांश स्थानिक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता तक्रारदार महिलांकडून केली जात आहे.
महिलां आणि तरुणींसोबत गैरकृत्य
मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील मुरगूड येथील हा डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करत होता. ही जाहिरात पाहून आजूबाजूचे अनेक लोक त्याच्याकडे उपचारासाठी येत होते.
याचाच फायदा घेत त्याने उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओही बनवले. यात स्थानिक महिलांसह तरुणींचा देखील समावेश असल्याचे कळतेय.
एकाच वेळी ४०० महिलांनी केली तक्रार
डॉक्टरने शूट केलेल्या क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. भीतीपोटी आतापर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. परंतु शनिवारी 400 हून अधिक पीडित महिलांनी निनावी पत्रे लिहून एकाच वेळी शहरातील आधिकाऱ्यांना मेल केले.
तसेच अज्ञात व्यक्तीने व्हायरल होत असलेले व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये घेऊन शहरातील प्रमुख राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोस्टाने पाठवले आहेत. या पत्रांमधून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

