Kolhapur News : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कलम 144 लागू

Kolhapur News : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत  अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत. यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केलेला आहे.

लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत अशी तक्रार कोल्हापुर महापालिकेकडे प्राप्त झाली हाेती. आज (बुधवार) पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथक यंत्रणेसह लक्षतीर्थ वसाहतीत कारवाईसाठी पाेहचले.

Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन; राजकीय वर्तुळातून हळहळ

या ठिकाणी कारवाई हाेऊ नये यासाठी परिसरात माेठा जमाव जमा झाला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केले आहे. या परिसरात येणा-या नागरिकांची तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आेळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये साेडले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply