Kolhapur : कोल्हापूरच्या जवानाला मणिपूरमध्ये वीरमरण, ८०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Kolhapur : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले. मणिपूर येथे भूस्खलनानंतर रस्ता तयार करण्याचे काम सुरु होते. त्याच दरम्यान सैन्यदलाच्या वाहनाचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये कोल्हापूरचे जवान सुनिल गुजर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गुजर यांच्या गावासह कोल्हापूरमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय २७) हे मणिपूरमध्ये होते. तेथे भूस्खलनानंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात झाला. हे वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळले. त्यात सुनिग गुजर यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव कोल्हापुरच्या शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर गावी पाठवले जाणार आहे.

Maval : होळी सणाला गोलबोट, पोहण्याच्या मोहापायी गमावला जीव; इंद्रायणी नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू

जवान सुनिल गुजर यांच्या पश्चात त्यांचे आईवडील, भाऊ आणि अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताने गुजर परिवारावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

२०१९ मध्ये सुनिल गुजर यांनी भारतीय सैन्यामध्ये प्रवेश घेतला होता. पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर गुजर यांची नियुक्ती ११० बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये झाली होती. कर्तव्य बजावत असताना भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply