Kolhapur : 'लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत'; इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

Kolhapur : लंडनमधील व्हिक्टोरिया अन्ड अल्बर्ट म्युझियममधून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. त्यासंदर्भात म्युझियमकडून पत्र मिळाले असून, शासनातील संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली

म्युझियमकडून मागविलेल्या माहितीतून ती वाघनखं शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही. शासन, मंत्री, संबंधित अधिकारी महत्त्वाची माहिती जनतेपासून लपवत असून, ही गंभीर बाब आहे. शिवप्रेमींची दिशाभूल करण्यात येत आहे.

Maharashtra Politics : मराठा ओबीसी वाद मिटणार? आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, शरद पवारांसह दोन्ही ठाकरेंना निमंत्रण

ते म्हणाले, 'वाघनखांची प्रतिकृती महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जात आहे. सातारच्या छत्रपती घराण्याकडे शिवरायांची वाघनखं कायम राहिली आहेत. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ग्रँड डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट म्हणून देण्यात आली. ती त्याच्याकडे कशी आली, याचीही माहिती नाही. ती १८१८ च्या दरम्यान त्याच्याकडे आली असल्याचा अंदाज सांगितला जातो.

मॉडर्न रिव्ह्यूच्या अंकात १९०७ ला साताऱ्यातील वाघनखांचे छायाचित्र छापले आहे. इतिहास अभ्यासक एच. वेबरीज याने १९२१ला केंब्रिज विद्यापीठाकडून छापलेल्या लेखात व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असणारी वाघनखं शिवरायांच्या वाघनखांची प्रतिकृती असल्याचे म्हटले आहे.' पत्रकार परिषदेस राम यादव, अमित आडसूळ उपस्थित होते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply