Kolhapur News : बंद करा कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

Kolhapur News : इचलकरंजी शहरात बीओटी तत्त्वावर असलेल्या कत्तलखान्याला आज (साेमवार) हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. कत्तलखाना बंद करा अशी मागणी करीत आज हिंदुत्ववाद्यांनी शिवतीर्थ ते प्रांताधिकारी कार्यालय असा माेर्चा काढला.

इचलकरंजी शहर आणि परिसरात या कत्तखान्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य देखील पसरत आहेत. यावर नगरपालिका कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत. 

Maharashtra Budget Session : सरकारला आशा सेविकांची कदर नाही, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

हिंदुत्ववादी संघटनांनी आज एकत्र येत कत्तलखाना बंद करा अशा घाेषणा देत शिवतीर्थ ते प्रांताधिकारी कार्यालय असा माेर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घाेषणा देत प्रांताधिकारी कार्यालय परिसर दणाणून साेडला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply