Kolhapur Crime News : कोल्हापुरात युवकांच्या गटात राडा, दहा गाड्यांची ताेडफोड; पाेलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

Kolhapur Crime News : पूर्ववैमनसयातून साेमवारी सायंकाळी कोल्हापुरातील टाकला परिसर झोपडपट्टीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवारी, काट्या ,कोयते घेऊन सुमारे 50 ते 60 युवकांनी दहशत वाजवली. या टोळक्यांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत टेम्पो, पाच मोटारी, चार दुचाकी अशा दहा वाहनांचे मोठं नुकसान झाले आहे. 

कोल्हापुरातील टाकळा झोपडपट्टी परिसरात साेमवारी सायंकाळी कावळा नाका येथील युवकांच्या गटाने हल्ला केला आहे. रुक्मिणी नगरातील एका शाळेत विद्यार्थ्यांचा वाद आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यापर्यंत त्याबाबत तक्रार झाली होती.

Pramod Sawant : प्रमोद सावंत यांची पाच वर्षे पूर्ण ; गोव्यात कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री

यातील काही मुले कावळा नका येथे राहतात. त्यांच्याकडून टाकळा परिसरातील जाम खांडेकर कॉलनी परिसरातील विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. त्यामुळे परिसरातील काही युवकांनी साेमवारी सकाळी शाळा परिसरात जाऊन विद्यार्थ्यांना आणि कावळा नाका परिसरातील युवकांना ताकीद दिली होती.

याचा राग मनात धरून साेमवारी सायंकाळी 50 ते 60 युवकांच्या गटाने काट्या, तलवार, कोयते दगड घेऊन त्यांनी अचानक हल्ला केला. यामध्ये तिथे असणाऱ्या चार चाकी दुचाकी गाड्यांची तोडफोड केली तर काहींनी दगडफेक केली. यामुळे या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *