Kolhapur Flood : कोल्हापूरला पुराने वेढलं; जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर, KDRFकडून बोटीतून नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

Kolhapur : कोल्हापुरात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पूराने वेढलं आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. या पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाला घटनास्थळी सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोल्हापुरातील मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा पुलाजवळ पाणी आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. या परिसरात महिला आणि रुग्णांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी केडीआरएफ बोटीच्या सहाय्याने त्यांना दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहेत. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली गेलं आहे. शिरोळ तालुक्याला पुराचा धोका सांगण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील विविध गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.

Maharashtra : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला मदतीचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा. प्रशासनाने सज्ज राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. तसेच त्यांना निवारा केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध कराव्यात. 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोज

मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद

जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोल्हापूर -रत्नागिरी राज्यमार्ग, कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग, कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्ग, कसबा बावडा ते शिये मार्ग बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरातील तीन रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे सीपीआर चौक ते महावीर कॉलेज रोड मार्ग बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातील कुंभार गल्ली, शाहूपुरी, सुतार वाडा, बापट कॅम्प परिसरात पाणी साचलं आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातील बालिंगा गावाजवळ पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील पूर्ण वाहतूक बंद करण्यात आला आहे.

न करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply