Vishalgad News Today : संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा; 'विशाळगडा'वरून राजकारण तापलं, आंदोलकांची तीव्र निर्देशने

Kolhapur : कोल्हापुरात विशाळगडावरून राजकारण तापलं आहे. विशाळगडाच्या पायथ्यांशी तोडफोड झाल्याची घटना घडली. दुसरीकडे या कामाविरुद्ध मुस्लिम समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीवरून मुस्लिम समाजाने तीव्र निदर्शने केली. तसेच गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीचा मुस्लिम समाजाने निषेध केला. तसेच संभाजीराजे छत्रपती यांना अटक करण्याचीही मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करण्यात आलं. यावेळी मुस्लिम समाजातील व्यक्तींनी रस्त्यावर घोषणाबाजी केली. तसेच संभाजीराजे यांच्या अटकेसाठीही घोषणाबाजी केली.

Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात मुसळधार; कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर, काही गावांचा संपर्क तुटला

अतिक्रमण काढण्यास सुरुवात

कोल्हापूरच्या विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहोचले आहेत. तर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहोचले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.

खासदार शाहू छत्रपती करणार विशाळगडाची पाहणी

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश आहे. आम्ही घटनेपूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात आक्रमक

संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी यांनी पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मला त्वरित अटक करा. मी इथून उठणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केली.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फोनद्वारे संभाषण सुरू आहे. तसेच संभाजीराजे यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आली समोर आली आहे. विशाळगडावरील अतिक्रमण आणि काल झालेल्या घटनेबाबत संभाजीराजे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून संवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply