
Kolhapur : पौराणिक आणि ऐतिहासिक वारशाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महोत्सवाची राज्य पर्यटन विभागाच्या दिनदर्शिकित प्रमुख पर्यटन महोत्सव (सन २०२५-२६) अशी नोंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. या शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यानुसार कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जातो. म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणेच हा शाही महोत्सव लोकप्रिय होत आहे. दरम्यान कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.
महोत्सवांतर्गत होणार विविध उपक्रम
सन २०२३ मध्ये दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती. परंतु त्यावर अद्याप काही कार्यवाही झाली नव्हती. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. त्यानुसार सरकारने दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषण केली. या महोत्सवांतर्गत २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम होणार आहेत.
पर्यटनाचा वारसा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या किल्ले पन्हाळगड तसेच श्री अंबाबाई मंदिर, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आदी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक स्थळे जिल्ह्यात आहेत. पर्यटकांना निवासासाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळाही आहेत. आता दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूरमध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी अन्य पर्यटन स्थळांना जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

