Kokan Rain Update : कोकणात मुसळधार! सावित्री आणि विशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; रायगड-रत्नागिरीतील शाळांना सुट्टी

Kokan Red Alert: कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणतील जिल्ह्यांमध्ये देखील तिच परिस्थिती आहे.

मुसळधार पावसामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, गांधारी, कुंडलिका, पाताळगंगा आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पावसामुळे महाड येथे पुरसदृष्य परीस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरातील सकल भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे रायगडमधील सर्वच जिल्ह्यांमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे

Pune Traffic : मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प; नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी जिल्ह्यात देखील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी नदी पात्राबाहेर येऊन काही सखल भागांमध्ये शिरले आहे. नदीचे पाणी नाईक कंपनी, मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूटापर्यंत पाणी भरलेले आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नगरपालिकेच्या बोटी, तलाठी, पोलीस आणि एनडीआरएफची पथके सहा ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

पूराचे पाणी काही घरांमध्ये शिरल्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply