KK चा मृत्यू अनैसर्गिक; चेहरा आणि डोक्याला जखमा, पोलिसांची माहिती

प्रसिद्ध गायक KK याचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. KK म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ याचा कोलकत्तामध्ये एक कॉन्सर्ट सुरू होता. यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र कोलकता पोलिसांनी त्याचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं नोंदवलं आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कोलकत्तामध्ये आपल्या शोनंतर परतत असताना ग्रँड हॉटेल इथं केके (KK) हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं, मात्र तिथंच त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, KK च्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. कोलकत्तामधल्या एसएसकेएम रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येणार आहे. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

KK याने ए.आर. रेहमानचं (A.R.Rehman) सुपरहिट गाणं कल्लुरी साले आणि हॅलो डॉक्टर याच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये गुलझार यांच्या माचिस या चित्रपटातल्या 'छोड आये हम' या गाण्यातला छोटा भाग गाऊन प्रवेश केला. १९९९ सालच्या 'हम दिल दे चुके सनम' (Hum dil de chuke sanam) या चित्रपटातल्या 'तडप तडप के' या गाण्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply