Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? ईडीने मागवली कोविड घोटाळ्याची कागदपत्रं

Kishori Pednekar : कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडीने देखील लक्ष घातले आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या ईडीच्या रडारावर आल्या आहेत. पेडणेकर यांच्यावर सुरू असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे ईडीने मागवल्याचे माहिती समोर आली आहे.

ईडीने कोविड घोटाळ्याची चौकशीदरम्यान बॉडी बॅग घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या घोटाळ्यामध्ये १७०० ते १८०० बाजारमुल्य असलेल्या बॉडी बॅग साडेसहा हजार ते ६८०० रुपयांनी विकत घेतल्याचा आरोप आहे.मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग दोन हजारांऐवजी ६८०० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Pune Chandni Chowk : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, चांदणी चौक उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार

कथित कोविड गैरव्यवहारप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी कलम ४२० आणि कलम ‘१२० ब’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड काळातील चार कथित गैरव्यवहारांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यात बॉडी बॅग खरेदी प्रकरणाच्या गैरव्यवहाराचा समावेश आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply