Kishor Aware Case : किशोर आवारे हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या

Maval  : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला यास पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. 

काही महिन्यांपुर्वी तळेगाव येथे आवारे यांचा खून झाला. ते पालिकेत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चाैघांनी किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामधील दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला तर दोघांनी कोयत्याने वार केले.

Follow us -

या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. पण उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषीत केले हाेते.

दरम्यान पाेलिसांनी घटनेची कसून चाैकशी करीत संशयितांना अटक केली आहे. अद्याप या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply