Kirit Somaiya : कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांचं ट्वीट; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत केली चौकशीची मागणी

Kirit Somaiya : भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त देखील प्रसारीत केलं आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, व्हिडीओ प्रसारित होताच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे.

या पत्रात किरीट सोमय्या यांनी कथित व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांक डेकेली आहे.

Bhiwandi Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने काळी पिवळीला उडवलं; ६ जणांचा जागीच मृत्यू

सोमय्या यांचं फडणवीसांना पत्र जशाच तसं

प्रति,

मा. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. देवेंद्रजी

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार.... झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply