Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Mumbai-pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भल्या पहाटे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याचं समजतेय. कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामद्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. यामधील ८ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजतेय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ पहाटे चार वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलेय. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर पहाटे ४ वाजता एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. खोपोलीजवळ पहाटे चार वाजताच्या (Raigad Khopoli Private bus accident) सुमारास अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमधील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले आहेत.

PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसचा खोपोलीजवळ अपघात झाला. पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उभ्या असलेल्या ट्रकला जोरदर धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना मुंबईतील रुग्णालयात शिफ्ट कऱण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर खोपोलीत वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही वाहने बाजूला गेल्यानंतर सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply