Khandala Fire : मोठी बातमी! खंडाळा घाटात टँकरला भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू , २ जण जखमी

Khandala Fire : खंडाळा घाटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खंडाळा घाटात ऑइल टँकरला भीषण आग लागली आहे. या घटनेत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही व्यक्ती जखमी झाल्याचे समजले आहे. आग इतकी भीषण आहे की, मुंबई-पुणे वाहतूक देखील ठप्प झाली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर टँकरला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन व्यक्ती होरपळल्याची भीती आहे. एक्सप्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर ही घटना घडली आहे. दोन्ही बाजूची रहदारी सध्या थांबवण्यात आली असून आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुर्दैवाने यात दोन जण होरपळले असल्याचे समजते. तसेच एका महिलेचा मृत्यू झालाय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply