Khadakwasala Dam : खडकवासला धरण साखळीत २४ तासात वाढले एक टीएमसी पाणी

खडकवासला - खडकवासला धरण साखळीत गुरुवारी संध्याकाळपासून शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या २४ तासात सुमारे एक टीएमसी पाणी जमा झालेले आहे. तर पानशेत धरणात ५० टक्के म्हणजे ५.३४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

आज सकाळपासून धरणांवर सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी होता. खडकवासला येथे एक, पानशेतला सहा, वरसगावमध्ये आठ, तर टेमघरला १२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण साखळीत गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता १२.९० टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता चारी धरणात मिळून १३.८१ टीएमसी पाणी साठा जमा झालेले आहे. अशाप्रकारे धरणात २४ तासात एक टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे.

41 IAS Officers Transfer List : राज्यातील ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

२१ जुलै २०२३ संध्याकाळी पाच वाजताची स्थिती

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७/१.१९/६०.२६

पानशेत- १०.६५/ ५.३४/५०.१४

वरसगाव- १२.८२/ ६.१२/४७.७३

टेमघर- ३.७१/ १.१६/ ३१.३१

चार धरणातील एकूण क्षमता२९.१५ टीएमसी

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा १३.८१ टीएमसी / ४७.३७टक्के



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply