Ketan Tirodkar Arrested : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक; उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Ketan Tirodkar Arrested : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणे महागात पडले आहे. केतन तिरोडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक केली आहे. सोशल मीडियावर फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी पत्रकार तिरोडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फडणवीसांना धमकी दिली होती. तसेच व्हिडिओ पोस्ट करत बदनामी केली होती. तिरोडकर यांनी फडणवीसांनी ड्रग्स माफियांना मदत केल्याचा आरोप केला होता.
 
पोलिसांनी तिरोडकर यांना कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर तिरोडकर यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे.पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने माजी पत्रकार तिरोडकर यांच्या विरोधात प्रॉडक्शन वॉरंट काढलं होतं. त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.दरम्यान, सायबर पोलिसांनी त्यांना एका प्रकरणातून ३५४ कलम प्रलंबित खटल्याप्रकरणी अटक केली होती.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply