Kesharinath Tripathi : भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kesharinath Tripathi: पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८ डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज ८ जानेवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

केशरीनाथ त्रिपाठी ८ डिसेंबर रोजी बाथरूममध्ये पडले होते. यावेळी त्यांच्या हाताला जबर मार लागला होता आणि फ्रॅक्चर झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत होता. तसचे शरीरातील ऑक्सिजन देखील कमी जास्त होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले आहे. रविवारी दुपारी ४ वाजता प्रयागराज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply