Kesansathi Tips : केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहात? अशी घ्या केसांची काळजी

Kesansathi Tips : केस आपलं सौदर्य वाढवण्याचे काम करतात. केस जेवढे निरोगी आणि सुंदर असतील तेवढेच तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसते. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे खूप गरजेचे असते. परंतु काहींना केसगळती, कोंडा किंवा केसांशी संबंधीत इतर समस्यांचा सामना करावा लगतो. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केस नेहमी स्वच्छ धुण्याशिवाय ते मजबूत आणि निरोगी (Black and Silky Hair) राहण्यासाठी काही घरगुती उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे असतात. रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. केस हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे महागडे उपचार  घेतात. परंतु आज आम्ही तुम्हाला केसांची घरीच कशी काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणार आहोत

हे उपाय करून निरोगी ठेवा केस

  1. स्कॅल्प स्केलर (Scalp scalar) हा शैम्पूचा एक प्रकार आहे. यामुळे केस मजबूत होतात. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शैम्पूने केस स्वच्छ धुवा. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
  2. केसांना शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनर (Conditioner) वापरा. कंडिशनर लावल्यानंतर 2 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. हे लक्षात ठेवा की कंडिशनर केसांच्या मुळांवर लावू नका.
  3. हेअर मास्क (Hair mask) केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.
  4. अॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) केसांसाठी खूप फायदेशीर असते. कोरियन महिला त्यांच्या केसांवर केवळ अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. केस धुण्याआधी 5 मिनिटांपूर्वी केसांना अॅप्पल साइडर व्हिनेगर लावा. यामुळं केसांच्या स्कॅल्पची पीएच पातळी संतुलित राहते.
  5. डोक्यावर तेल लावून बोटांनी हळुवार मालिश (oil massage) करावी. मालिश केल्यामुळे डोक्यावरील त्वचेचे रक्ताभिसरण सुरळीत होते. ही मालिश साधारणत: 10 ते 15 मिनिटे करावी. परंतु मालिश करताना हाताच्या तळव्याने डोके रगडू नये, त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.
  6. मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेल केसांना दोन ते तीन मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून (Tie Hot towel) ठेवावा. यामुळे तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असे करताना टॉवेलचे तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टॉवेलमुळे केसांना इजा होऊ शकते.
  7. केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर (Use cold water) करा. थंडीच्या मोसमात देखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क आणि रखरखीत होतात. तसेच केस गळायला सुरवात होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply