KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप

KEM Hospital Mumbai Sexual Harassment : मुंबईतील केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरवर सहा महिला डॉक्टरांनी विनयभंगाचा आरोप केला आहे. या आरोपानंतर केईएममध्ये खळबळ उडाली आहे. केईएममधील फॉरेन्सिक विभागातील प्राध्यापक डॉक्टर रवींद्र देवकर यांच्याविरोधात सहा महिला डॉक्टरांनी गंभीर आरोप करत विनयभंगाची तक्रार केली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपानंतर डॉक्टर रवींद्र देवकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका तसेच हॉस्पिटलची अंतर्गत तक्रार समितीने देखील चौकशीला सुरुवात केली आहे. सहा महिला डॉक्टरांनी हॉस्पिटलचे डीन आणि फॉरेनची मेडिसिन डिपार्टमेंटच्या प्रमुखांकडे रवींद्र देवकर याची तक्रार केली होती. डॉक्टर रवींद्र देवकर याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

केईएम रुग्णालयात फॉरेन्सिक विभागातील प्राध्यापक डॉ. रविंद्र देवकर यांच्यावर रुग्णालयातीलच ६ महिला डॉक्टरांनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केलाय. या प्रकरणी रुग्णालयाच्या डीनकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र देवकर याला निलंबित करण्यात आले असून रूग्णालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.

डॉ. रविंद्र देवकर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ६ महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाचा आरोप केलाय. डॉ. देवकर यांनी या डॉक्टरांच्या मांडी आणि पाठीवर हात फिरवून मानसिक आणि शारीरिक छळ केला, असे महिला डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटलेय.दरम्यान, महिलांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. देवकर यांना कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. चौकशी समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल, असे केईएमकडून स्पष्ट करण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply