KDMC Commissioner : कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून IAS अभिनव गोयल यांची नियुक्ती

KDMC Commissioner : आयएएस अभिनव गोयल हे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काम पाहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे सध्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. आता ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्यांनी हिंगोलीत खूप चांगले काम केले आहे. त्यानंतर आता त्यांची नियुक्ती कल्याण-डोबिंवली महानरपालिकेत झाली आहे. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काही दिवसापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची पालघर जिल्हा अधिकारी कधी बदली करण्यात आली. त्यानंतर आयुक्त पद हे रिक्त होते. या रिक्त पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आज शासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी गोयल यांची वर्णी लावली आहे. त्यांनी त्वरित आयुक्त पदाचा चार्ज घ्यावा असेही बदली पत्रात म्हटले आहे.

Follow us -

Pune Crime : संतापजनक! पुण्यात भूतानच्या २७ वर्षीय तरूणीवर ७ जणांचा बलात्कार

कल्याण डोंबिवली महापालिकेत बेकायदा बांधकामांचा प्रश्न आहे. बेकायदा बांधकाम तोडणे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आर्थिक स्थिती सुधारणे. महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही विकास कामे मार्गी लावणे हे प्रमुख आवाहने नव्या महापालिका आयुक्तांच्या समोर राहणार आहेत. नवे आयुक्त गोयल हे प्रशासनाचा कारभार कशाप्रकारे चालवतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply