श्रीनगर : ‘दि काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा संदर्भ देत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी या चित्रपटामुळे देशभर काश्मिरींबाबत द्वेषाची भावना निर्माण झाली असून विविध भागांत शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर हल्ले होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
कोणत्याही राज्यामध्ये काश्मिरी विद्यार्थ्यावर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ही केंद्र आणि संबंधित राज्य सरकारची असेल. काश्मिरी मुस्लिम हे इतरांच्या श्रद्धांचा आदर ठेवत नाहीत असे मत तयार केले जात आहे. याचा मोठा धोका बाहेरील राज्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. आता सध्या वयाची विशी गाठलेले हे विद्यार्थी १९९० मध्ये जन्मले देखील नव्हते. आता याच विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी नमूद केले.
‘दि काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे कथानक कपोलकल्पित असून अनेक खोट्या गोष्टी त्यात मांडण्यात आल्या आहेत. जेव्हा हे सगळे घटले १९९० च्या सालामध्ये राज्यात ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे सरकार नव्हते. राज्यात राज्यपालांची राजवट होती तर केंद्रामध्ये व्ही.पी. सिंह यांचे सरकार सत्तेत होते.’’ असे त्यांनी नमूद केले. ‘‘ मुळात ही कलाकृती डॉक्युमेंट्री आहे की सिनेमा हेच स्पष्ट होत नाही. या चित्रपटामध्ये अनेक असत्य गोष्टी मांडल्या असून त्यातील सर्वांत मोठे असत्य हे तेव्हा राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार होते हे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे सगळे घडले तेव्हा राज्यपालांची राजवट होती. केंद्रामध्ये भाजपच्या पाठिंब्यावरील व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. या काळामध्ये केवळ काश्मिरी पंडितांचीच हत्या झाली नाही तर मुस्लिम आणि शिखांना देखील ठार मारण्यात आले होते. मुस्लिम आणि शिखांना देखील काश्मीर सोडावे लागले होते.’’ असे उमर यांनी नमूद केले.
जे लोक सत्य जाणून घेऊ इच्छितात किंवा ज्यांना त्याची आस आहे त्यांनी ‘दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट अवश्य पहावा, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या बहुचर्चित चित्रपटाला आपल्या पसंतीची पावती दिली.
‘दि काश्मीर फाईल्स’ हा काश्मीर खोऱ्यात १९९० मध्ये काश्मिरी पंडितांचा जो नरसंहार झाला त्याची भयावह कथा चित्रबद्ध करणारा चित्रपट सध्या सर्वत्र गाजत आहे. ११ मार्चला प्रदर्शित झाल्यावर जेमतेम ४-५ दिवसांतच या चित्रपटाने कमाईचे व चर्चेचे सारे विक्रम मोडले आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी व भाजप नेत्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अग्निहोत्री व पल्लवी जोशी यांनी सरसंघचालकांची नुकतीच भेट घेतली. दरम्यान, संघाने होळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनौपचारिकरित्या बोलताना एका ज्येष्ठ संघनेत्यांनी मात्र अशी भेट झाल्याचे वृत्त नाकारले.हे पण वाचा-
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


