Kasba Bypoll Election: मनसे लढवणार कसबा पोटनिवडणूक! राज ठाकरे २ दिवस पुणे दौऱ्यावर

MNS Candidates For Kasba Bypoll Election: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यासाठी दोन दिवसीय पुणे दौरा करणार आहे. उद्यापासून राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असतील.

राज ठाकरे त्यांच्या पुणे दौऱ्यात पक्षाच्या शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. शहर कार्यकारणीने कसबा पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांच्या नावांची यादी तयार केली आहे. राज ठाकरे ही यादी तपासून उमेदवार निश्चित करतील अशी माहिती आहे.

सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेवर मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा विश्वास मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे राज मनसेनेही या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

मनसेकडून कसबा निवडणुक लढण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी आणि बाळा शेडगे ही नावे आहेत. राज ठाकरे यापैकी कोणाला कसब्याची उमेदवारी देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसब्यातून हेमंत नारायण रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीने देखीली उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे, तर कसबा मतदारसंघासाठी काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास शिच्छित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply