Kasara Ghat Accident : कसारा घाटात ट्रकचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Kasara ghat accident News today : कसारा घाटात भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय, तर एकजण जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. ट्रक पलटी झाल्यानंतर काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली होती. थोड्यावेळानंतर वाहतूक सुरळीत झाली.

मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात हा अपघात झाला. नवीन कसारा घाटतून उतरत असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक पलटी झाला. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Panvel to Borivali : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पनवेल ते बोरीवली प्रवास होणार जलद, अगदी २० रूपयांत

ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे नवीन कसारा घाटात ट्रक पलटी झाला. हा ट्रक काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तीला दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्ग पोलीस व रूट पेट्रोलिंग टीमच्या सहाय्याने बाहेर काढले. जखमी व्यक्तीला कसारा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात झाला. या अपघातानंतर कसारा घाटात थोडावेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात वाहने होती, त्यात अपघात झाल्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागला



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply