Kasara Ghat : मोठा अपघात टळला; प्रवाशांचा जीव मुठीत, जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना बचावली

Shahapur : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली आहे. यामुळे मोठा अपघात टळला आहे. बसचे मागील चाक रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र या अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते. 

मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने घाटातील रस्ता काही ठिकाणी खचलेला आहे. दरम्यान मुंबईहून संभाजीनगर येथे आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्स कसारा घाट रस्त्यातून मार्गस्थ होत असताना रस्ता खचलेल्या ठिकाणी बस आली असता बस स्लीप झाली. याठिकाणी खॊल अशी दरी आहे. चाक अधिक खोलात गेले असते तर हि बस खोल दरीत कोसळली असती. नशीब चांगले म्हणून बस दरीत कोसळलतांना वाचली आहे. यामुळे बसमधील प्रवाशी देखील सुखरूप आहेत.  

MP Road Accident: भयंकर! भरधाव बस दगड भरलेल्या डंपरमध्ये घुसली, ९ जण ठार; जेसीबीने पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

दरम्यान महामार्गावरील कसारा घाटतील आंबा पाॅईटजवळ रस्ता खचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या खचलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप देखील या कसारा घाटतील खचलेल्या रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही. हे काम सुरू असलेल्या ठिकाणी बस आली असता मागील चाक खचले. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र या बेजबाबदार ठेकेदार गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply