Kasara Accident : मुंबईहून निघाले अन् कसाऱ्यात काळाने घाला घातला, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई नाशिक महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघात इतका भंयकर होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, एका जणांने उपचाराला घेऊन जाताना जीव सोडला. दोन जणांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येतोय. शहापूरमधील कसारा येथे काल रात्री हा अपघात झाला. मुंबईहून कारने निघाले होते, त्यावेळी हा भयंकर अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कारवर काळाने घाला घातला. शहापूर तालुक्यातील कसारा येथील ऑरेंज हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमी पैकी एकाचा रूग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.

कसारा येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर भयंकर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींना तातडीने रूग्णलयात दाखल करण्यात आले. मृतदेह खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन जखमींवर सध्या जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 
 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *