Kasaba-Chinchwad By Election : टिळक फॅमिलीचा पत्ता कट, कसबा-चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार ठरले!

Kasaba-Chinchwad By Election : पुण्यातील चर्चेतील पोटनिवडणुक कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक होते इच्छुक होते. 


मात्र भाजपकडून  हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांच्यावतीने त्यांच्या एका महिला कार्यकर्त्याने काल गुरुवारी (ता. २) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय असलेल्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातून अर्ज नेला आहे. दरम्यान अश्‍विनी जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply