Karnataka Maharashtra Border Dispute : भाजप विरोधात मित्र पक्षाचेच आंदोलन; बाळासाहेबांच्‍या शिवसेनेतर्फे जोडेमारो आंदोलन

सांगली : कर्नाटक– महाराष्‍ट्र सिमा वाद सुरू आहे. या वादात मिरजेत बाळसाहेबांची शिवसेनेतर्फे कर्नाटकचे भाजप मुख्यमंत्री बोमाई यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तसेच भाजप मित्र पक्षा विरोधात निषेध केला.

कर्नाटक सिमा वाद पुन्हा उफाळून आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये गेलेल्या गाड्या फोडल्यामुळे महाराष्ट्र सरकारमधील भाजप मित्र पक्ष बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. आज कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोमई यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाराणा प्रताप चौक या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले.

कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या डिजिटल फलकाला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना मित्र पक्ष असला तरी मराठी माणसांवर केलेला अन्याय कधीही सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *