Karnataka Hijab Ban : कर्नाटकात हिजाबवरील बंदी उठणार, काँग्रेस सरकारने केली मोठी घोषणा

Karnataka Hijab Ban : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हिजाबवरील बंदी लवकरच उठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यातील महिला हवे ते परिधान करू शकतात.

सोशल मीडियावर घोषणा करताना ते म्हणाले की, भाजपला पोशाख आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडायची आहे. पण मी हिजाब बंदी मागे घेण्याची घोषणा केली आहे. 

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात! ६ गाड्यांचा चुराडा; भाविक जखमी

म्हैसूरमध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आता हिजापवर बंदी नाही. महिलांना हवे ते परिधान करता येईल. ते म्हणाले की, मी बंदी उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुम्हाला काय खायला आवडते किंवा काय घालायला आवडते? हे तुमचे तुम्ही ठरवा. मी यात ढवळाढवळ का करावी? सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यातील लोक त्यांच्या इच्छेनुसार कपडे परिधान करू शकतात. 

दरम्यान, 2022 मध्ये भाजपच्या बोम्मई सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली. पुढे कर्नाटक उच्च न्यायालयानेही ही बंदी कायम ठेवत इस्लाममध्ये हिजाब आवश्यक मानला जात नसल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये समान संहितेचे पालन करावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

उच्च न्यायालयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटले होते. दुसर्‍या न्यायमूर्तींनी म्हटले होते की, कपडे परिधान करणं ही निवडीची बाब आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply