karnataka Bus Accident : देवदर्शनाहून परतताना मोठी दुर्घटना! बस आणि कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा मृत्यू

Karnataka Bus Accident : कर्नाटकच्या  रामनगर जिल्ह्यात बस- आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनासाठी निघालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. कनकापुरा तालुक्यातील केम्माले गेटजवळ ही दुर्घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामनगर जिल्ह्यातील केएसआरटीसी बस आणि कारमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कारमधील प्रवासी तीर्थक्षेत्र माले महाडेश्वराहिल येथून बेंगळुरूला जात होते. कर्नाटक सरकारची बस बंगळुरूहून मालवल्लीच्या दिशेने जात होती.

Maharashtra Drought : राज्य सरकारचा मोठा, दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी वॉर रुममधून लक्ष ठेवणार

दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोराची होती की सहा जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना रामनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काकूर झाला. नागेश, पुट्टाराजू, जोतिर्लिंगप्पा (कार मालक), गोविंदा आणि कुमार अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बंगळूर असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हालवले. या अपघातात बस चालकालाही गंभीर दुखापत झाली असून, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील इतर अनेक प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply