Kalyan News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून होणार प्रतिबंधात्मक कारवाई

 

Kalyan News

Kalyan News : गोळीबार प्रकरणानंतर जेलमध्ये असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांच्या देखील अडचणीत वाढ होताना दिसत आहे.  गोळीबारच्या आधी रस्त्याच्या भूमीपूजन दरम्यान एका शाळेतील पालकांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. या वादानंतर भाजपआमदार गायकवाड यांचे समर्थक संदीप तांबे आणि अन्य दोन जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

कल्याण जवळील द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या खळबळजनक घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्यासह  तीन जणांना अटक करन्यात आली. त्यानंतर अन्य दोन जणांना अटक केली. या पाचही जणांना १४ दिवसाांची पोलिस कोठडी देण्यात आली. १४ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

Maharashtra Politics : "उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात, लवकरच एकनाथ शिंदेंचं नेतृत्त्व स्वीकारतील"

जागेवरून झाला वाद 

गोळीबार प्रकरणाच्या आधी एक दिवस आधी कल्याण पूर्वेतील नूतन विद्या मंदिर शाळेच्या समोरील जागेत रस्ते विकासाचा भूमीपूजन कार्यक्रम झाला. हा रस्ता आमदार गायकवाड यांच्या आमदार निधीतून करण्यात येत असल्याने त्याठिकाणी आमदार गायकवाड पोहचले असता स्थानिकांनी त्यांच्या भूमीपूजनास विरोध करीत जागा चर्चची असल्याचे सांगितले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नागरीक यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एनसी दाखल केली होती. याच प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांकडून संदीप तांबे यांच्यासह अन्य दोन जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप समर्थकांच्या अडचणीत वाढ होत आहे; अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply