Kalyan News : कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे

Kalyan News : दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक दुचाकी किंवा चारचाकी घेतात. विविध शहरात लाखभर वाहनांची भर पडते. अशातच कल्याण आरटीओ परिक्षेत्रात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

वाहनं उभी करण्यास सोसायटीत जागा नाही तर केडीएमसीचे वाहनतळ फुल झाले आहेत. रस्त्यावर वाहनं पार्क केली तर, वाहतूक पोलीस कारवाई करतात. त्यामुळे गाड्या पार्किंग करायच्या कुठे? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झालाय.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात डिसेंबर २०२४ अखेर १४ लाख ६५ हजार १९४ वाहनांची नोंद झाली होती. यामधील कल्याण डोंबिवलीतील जवळपास ७ लाख म्हणजेच निम्म्या वाहनांची नोंद झाली होती. शहरात लाखभर वाहनांची भर पडत असताना नियोजनाअभावी वाहनांसाठी पार्किंगची समस्या आता नागरिकांना भेडसावत आहे.

Kalyan News : रेल्वे स्टेशनजवळ पंचनाम्यासाठी गेले, API घटनास्थळी पोहोचताच नको ते घडलं; लोकलच्या धडकेनं...

काही नागरीकांना सोसायटी किंवा वाहनतळावर पार्किंगची जागा मिळाली नाही, की ते थेट रस्त्याच्या कडेला वाहन उभे करतात. पण वाहन चोरीला जाण्याचीही भीती असते. रस्त्याच्या कडेला उभे केलेले वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई देखील केली जाते. केडीएमसीने याबाबत नियोजन करून तात्काळ पार्किंग समस्या मार्गी लावावी, अशी मागणी आता वाहन चालकांकडून केली जात आहे.

याबाबत केडीएमसी चे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी सांगितले की ,शहरात सहा ठिकाणी केडीएमसीकडून वाहनतळ उभारण्यात आली आहेत .इतर प्रस्तावित ठिकाणी लवकरच वाहनतळे सुरू करण्यात येतील .तसेच पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर शहरात पार्किंग धोरण निश्चित करत अंमलबजावणी सूरु करण्यात येईल, असे क्या सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply