Kalyan Flyover : कल्याणकरांसाठी खुशखबर! एलिव्हेटेड उड्डाणपुलामुळे ४० मिनिटांचा प्रवास अवघ्या ५ मिनिटात

 

 

Kalyan Flyover : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणानं विठ्ठलवाडी ते पाम हॉटेल, या २.५ किमीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू केलं आहे. हा उड्डाणपुल कल्याण आणि आसपासच्या शहरातील लोकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एमएमआरडीएनं या प्रकल्पासाठी भू- तांत्रिक तपासणीचे काम सुरू केले आहे. या पुलामुळे ४० मिनिटांचा प्रवास अगदी ५ मिनिटात पूर्ण होणार आहे. ज्यामुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

या एलिव्हेटेड उड्डाणपुलामुळे उल्हासनगर, अंबरनाथ येथून कल्याणकडे येणारी वाहतूक मुख्य शहरातून, बिर्ला कॉलेज रोडमार्गे एलिव्हेटेड उड्डाणपुलावरून वळवण्यात येणार आहे. ज्याचा मुख्य फायदा प्रवासी आणि तेथील लोकांना होणार आहे. मुख्य म्हणजे वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. तसेच वेळेची देखील बचत होईल. या उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होण्याची देखील माहिती देण्यात आली आहे.
कल्याण मुरबाड रस्त्याचे काम सुरू

कल्याणमधील वालधुनी रेल्वे उड्डाणपुल, शहाड रेल्वे उड्डाणपुल आणि एफ केबिन उड्डाणपुल या तिन्ही उड्डाणपुलावरील वाहतूक या उड्डाणपुलामुळे कमी होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ७०० कोटी रूपये गुंतवले असून, त्यासाठी एमएमआरडीएनं खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या उड्डाणपुलाचे कल्याण मुरबाड रोडवरील पाम हॉटेलजवळ काम सुरू झाले आहे.

Ghatkoper Crime : शेजारच्यानं खेळण्याच्या बहाण्यानं घरी नेलं अन् केला लैगिंक अत्याचार, ३१ डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

३० महिन्यात काम पूर्ण

एलिव्हेटेड उड्डाणपुल पुर्ण झाल्यावर, या मार्गामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. जिथे ४० मिनिटे लागायचे, तिथे आता ५ मिनिटात हा प्रवास पूर्ण होणार आहे, असं कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहे. या उड्डाणपुलाबाबत एमएमआरडीएचे अधिकारे सांगतात, केडीएमसीनं या प्रकल्पासाठी ७० टक्के जमीन संपादित केली आहे. सर्व काही नियोजनानुसार काम पूर्ण झाले तर, उड्डाणपुलाचे काम ३० महिन्यात पूर्ण होऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply