Kalyan Fire News : इमारतीच्या १० व्या मजल्यावरील घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक

Kalyan Fire News : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना कल्याणमधून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका इमारतीमधील घराला आग लागल्याची घटना घडली. आज बुधवारी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीमधील नेमकी आग कशी लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा परिसरातील अमृत हेवन या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार; सरकारने दिलेली मुदत संपली, उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू

आग लागल्याचे कळतात घरातील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, घरातील खिडकीच्या बाहेर ज्वाला दिसत होत्या. या आगीची झळ बाजूच्या घराला देखील बसली आहे. 

या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घराला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आग इमारतीत इतरत्र पसरू नये म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply