Kalyan Crime News : आरपीएफ पोलीस उपनिरीक्षकाची काठीने मारहाण करत हत्या, कल्याणमधील खळबळजनक घटना

कल्याण : कल्याण आरपीएफच्या उपनिरीक्षकाची आरपीएफच्या जवानाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.बसवराज गर्ग असे मयत सब इन्स्पेक्टरचे नाव असून पंकज यादव असे आरोपीचे नावे आहे . दोन वर्षांपूर्वी पंकज यादव याचे एका प्रकरणात चौकशी करत त्याच्यावर कारवाई केली होती. या कारवाईचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली .

आरपीएफमध्ये बसवराज गर्ग सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थनगर येथील रेल्वेच्या बॅरेकमध्ये ते राहत होते. काल रात्रीच्या सुमारास बसवराज हे आपल्या बॅरेकमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत असताना त्या ठिकाणी अचानक आरपीएफ जवान पंकज यादव आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने व ठोशा-बुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 

पंकज हा पेण येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे जात अवघ्या सहा तासात पंकजला बेड्या ठोकल्यात. दोन वर्षांपूर्वी आरपीएफ कार्यालयात पंकज याचे त्याच्या सहकाऱ्याशी वाद झाल्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर वरिष्ठांनी पंकजवर कारवाई करत त्याची इन्क्रिमेंट थांबवली होती.

या कारवाईचा राग पंकजच्या मनात होता दोन वर्षापासून तो संधीच्या शोधात होता. अखेर काल त्याने बसवराज यांना गाठून त्यांची हत्या केल्याचे आता उघड झालं आहे. दरम्यान या चौकशी समितीमध्ये आणखी दोन जण सहभागी होते. त्यांच्या शोधात तो चिपळूणला जाणार होता. मात्र याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply