
Kalyan : कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. यातच दुकानात नकली पिस्तुलने धमकावत पैशांची मागणी केली. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसात तक्रार दिली. याचा राग मनात धरून या धमकवणाऱ्या तरुणाने पुन्हा तक्रारदाराच्या घरावर दगडफेक केली. तसेच गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
कल्याण पूर्वेकडील काटेमानेवली परिसरात मोहम्मद शब्बीर शेख हे भाऊ व वहिनीसह प्रभात चाळ येथे हँडवर्कचा छोटासा कारखाना चालवतात. याच कारखान्यात सुभान पठाण नावाचा तरुण येऊन वारंवार पैशांची मागणी करत होता. दरम्यान रविवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास नकली पिस्तुल दाखवत धमकाविले. तर थोड्याच वेळात सुभान पठाण आपल्या साथीदार सिद्धार्थ अहिरेसोबत परत आला आणि दोघांनी मिळून पुन्हा एक हजार रुपयांची मागणी केली.
|
Pune Dam Level : पुण्यात दिवसरात्र पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; कोणत्या धरणात किती पाणी? |
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
यावेळी शब्बीर शेख यांनी प्रसंगावधान राखत दोघांना कारखान्यातच अडवून ठेवलं आणि पोलिस कंट्रोल रूमला फोन करत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात दोघांना ताब्यात घेतलं. पोलिस तपासात त्यांच्या जवळील पिस्तुल बनावट असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काही तासांतच पोलिसांनी नोटीस देऊन दोघांना सोडून दिलं.
तक्रार केल्याच्या रागातून घरावर दगडफेक
पोलिसांनी सोडल्यानंतर दोघेजण तक्रारदाराच्या घराजवळ अन्य साथीदारांसह परत आले. याठिकाणी गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकू लागले. तक्रार मागे घेतली नाही, यामुळे त्यांच्या घरावर दगडफेक करत तक्रारदाराच्या घराचे आणि गाडीचे नुकसान करत तिथून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून पोलिसांकडून कारवाई नाही आणि गुन्हेगार मोकाट फिरतात. मग आम्ही करायचं तरी काय? असा सवाल पीडित कुटुंब करत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
- सेंट्रल बँकेत २५० हून अधिक स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती: १.२० लाखांपर्यंत पगार, आजच अर्ज करा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel

