Kalyan : पलावा- काटई उड्डाणपूल मे अखेरीस होणार खुला; वाहतूक कोंडीपासून होणार सुटका

Kalyan : कल्याण- शीळ रोडवरील पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मेपासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. सदरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याने येथून लाखो वाहन धारकांना वाहतूक कोंडीपासून होणार त्रास कमी होणार आहे. मी अखेरीला हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे

दिवा- पनवेल रेल्वेमार्गावरील या उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मे अखेरीस सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Akola : १० दिवसाआड पाणी, ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सरकारी कार्यालयात तोडफोड, खुर्च्या फेकल्या अन्..

कल्याण- शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

दोन्ही नव्या लेन सुरू झाल्यास पलावा जंक्शन परिसरात सहा लेनवरून वाहतूक सुरळीत होणार आहे. दरम्यान, आणखी दोन लेनचे काम सुरूच राहणार असून, त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या पुलामुळे कल्याण- शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

वाहनधारकांना मिळणार दिलासा

पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मेपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने उड्डाणपुलाच्या लेन उभारणीचेकाम गतीने सुरु आहे. अर्थात या लेन कार्यान्वित झाल्यास कल्याण, ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्य म्हणजे येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी देखील थांबणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply