Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला

Kalyan : कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका बारमध्ये अश्लील डान्सचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील प्रकाराचा पर्दाफाश केला. तसेच पोलिसांनी छापा टाकून ६ महिला सिंगरसह एकूण २३ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणानंतर कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे.

ही धाड पोलिसांकडून पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास टाकण्यात आली. नियमांच्या पूर्णपणे विरोधात, हा बार निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू होता. बारमध्ये महिलांकडून अश्लील कपडे घालून डान्स केला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ही धडक कारवाई केली. झोन ३ आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने संयुक्त कारवाई करत बारवर छापा टाकला, आणि ६ महिला सिंगर, बार मालक, मॅनेजर, वेटर आणि ग्राहक अशा एकूण २३ जणांना ताब्यात घेतलं.

Baramati News: बारामतीत पोलिसच असुरक्षित? स्टंट करताना हटकल्याने तरुणाची सटकली, थेट पोलिसाच्या अंगावर घातली कार

धाडी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा करत २८,९८० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. या कारवाईत बार मालक, मॅनेजर, वेटर, ग्राहक आणि महिला सिंगर अशा २३ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर कल्याण-डोंबिवली परिसरात चर्चा सुरू झाली आहे की, पोलिस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच जर नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पुढील तपास महात्मा फुले पोलीस करत असून, या प्रकरणाने बार चालकांच्या बेधडक कारभारावर आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply