Kabul Attack : अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरलं, चीनी हॉटेल लक्ष्य; मुंबईवरील 26/11 हल्ल्याची झाली आठवण

Kabul Hotel Attack: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी एका चिनी हॉटेलला टार्गेट केलं आहे. दहशतवाद्यांनी हॉटेलजवळ गोळीबार केला आणि मोठा ब्लास्टही केल्याचं समोर आलं आहे. या हल्लाने मुंबईवरील 26/11 हल्ल्याची आठवण झाली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाने AFP वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले. यावेळी त्यांनी ब्लास्ट देखील केले. ज्या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आहे तिथे चीनी अधिकारी वारंवार येत असतात. हा हल्ला कुणी केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजूनतरी या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.

काबूलमधील या हॉटेलमध्ये चीनी व्यापारी आणि अधिकारी यांची वारंवार ये-जा सुरु असते. त्यामुळे या हॉटेलला चीनी हॉटेल देखील म्हटलं जातं.

घटनास्थळावरील व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट बाहेर येताना दिसत आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply